काकाणी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा

 काकाणी विद्यालयात हरित सेने अंतर्गत विद्यार्थ्यांनी घेतली प्रतिज्ञा: नायलॉन मांजा वापरणार नाही 

मालेगांव दि.8 पतंगोत्सवाला जीव घेण्या स्पर्धेचे रूप नायलॉन मांजा वापरल्याने येत आहे; तेव्हा नायलॉन मांजा ऐवजी साध्या धाग्याचा वापर पतंग उडवण्यासाठी करावा असे मार्गदर्शन सामाजिक वनीकरणाचे वनरक्षक श्री.जी.व्ही. बोरसे यांनी केले. झुं.प.काकाणी विद्यालयाचे प्राचार्य श्री.गोविंद सर आणि उपप्राचार्य श्री.गोसावी के.डी. सर यांनी आपल्या मनोगतातून नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुर्घटना यांची माहिती देऊन नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कन्या विद्यालयातील हरित सेनेचे प्रमुख श्री.भोये सरांनी आपल्या मनोगतात पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. कन्या शाळेच्या शिक्षिका सौ.शुभांगी बच्छाव यांनी नायलॉन मांजा वापरणार नाही अशी प्रतिज्ञा सर्व विद्यार्थ्यांकडून वदवून घेतली. झुं.प.काकाणी विद्यालयातील श्री.मोरे वाय्. पी.सरांनी विद्यार्थी नायलॉन मांजा वापरणार नाही असे आश्वासन सामाजिक वनीकरण अधिकाऱ्यांना देऊन सर्व उपस्थितांचे आभार मानले.



याप्रसंगी सामाजिक वनीकरण मालेगाव येथील वनपाल श्री.एस्.आर.पगारे, वनरक्षक श्रीमती रोहिणी पाटील, वनरक्षक श्री.जी.व्ही. बोरसे, वनरक्षक श्रीमती रूपाली मोरे, झुं.प. काकाणी विद्यालयाचे प्राचार्य श्री.गोविंद सर, उपप्राचार्य श्री.गोसावी के.डी. सर कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.अरुणा देवरे मॅडम, पर्यवेक्षिका श्रीमती किरण टिपरे मॅडम, दोन्ही विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने