अबॅकस स्पर्धेत साई इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड
सटाणा :- विद्यार्थ्यांना गणित विषयात रुची व आवड निर्माण व्हावी म्हणून वैदिक गणित म्हणजेच अबॅकस शिकवले जाते.नुकत्याच नाशिक येथे झालेल्या अबॅकस स्पर्धेत साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या तेरा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यातील या स्पर्धेत राज्यस्तरीय पातळीवर चार विद्यार्थ्यांची निवड तर राष्ट्रीय पातळीवर दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यात आराध्या घोरपडे , मनस्वी बच्छाव, आरुषी वाघ, सार्थक खरोळे यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस परीक्षेत यश संपादित केले. आराध्या घोरपडे व मनस्वी बच्छाव यांनी १० मिनिटात १०० अचूक गणिताचे प्रश्न सोडवण्याचा विक्रम करून प्रथम क्रमांक पटकावत राष्ट्रीय स्तरासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा हैदराबाद येथे फेब्रुवारी मध्ये होणार असून राष्ट्रीय परीक्षेसाठी पाच मिनिटात शंभर प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक चेअरमन एडवोकेट शशिकांत अहिरे व प्राचार्या रोशनी अहिरे यांनी सन्मानचिन्ह व प्रमानपत्र देऊन त्यांचा गौरव केला. तसेच ही सर्व मुलं देशाचा आधारस्तंभ असल्याचे मत शाळेचे चेअरमन आहिरे यांनी पुरस्कार वितरणाच्या वेळी बोलताना व्यक्त केले.
शालेय शिक्षिका तसेच आय जीनियस अबॅकस अकॅडमी च्या मार्गदर्शिका प्रा. कविता पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शालेय शिक्षकवृंद व विद्यार्थी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
