बाल सावित्रीबाईंनी अनितामाई भुसे यांचा केला सन्मान...

 बाल सावित्रीबाईंनी अनितामाई भुसे यांचा केला सन्मान... 

नवीन प्राथमिक शाळा किल्ला यांचा स्तुत्य उपक्रम.

 मालेगाव - दि. 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिनानिमित्त नवीन प्राथमिक शाळा किल्ला तर्फे विद्यार्थ्यांना शालेय वयात प्रेरणा मिळावी म्हणून दरवर्षी 'सन्मान सावित्रीच्या लेकींचा' हा स्तुत्य उपक्रम राबविला जातो.या उपक्रमाअंतर्गत आज महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांच्या पत्नी सौ. अनितामाई भुसे यांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. तसेच वैद्यकीय क्षेत्रात योगदान देणाऱ्या डॉ.रागिणी भेलसेकर व पोलीस दलात योगदान देणाऱ्या सौ.पूनम राऊत यांचाही सन्मान करण्यात आला.चक्क शिक्षण मंत्र्याच्या घरी जाण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व आनंद दिसून आला. सावित्रीबाई फुले यांच्या वेषभूषेतील मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषणे सादर केलीत. विद्यार्थींनींचे भाषण ऐकून अनितामाई भुसे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.त्यांनी मुलींना शैक्षणिक साहित्य ही वाटप केले. आजच्या तिन्हीही सत्कारमूर्तींनी या उपक्रमाचे कौतुक केले व आभार ही मानले.सौ.पूनम राऊत यांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ या पुस्तिका भेट दिल्या.डॉ.रागिणी यांनी आरोग्याच्या टिप्स दिल्या.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता मंडळ,पर्यवेक्षक नरेंद्र गुरव,उपशिक्षिका सौ.हेमलता मोरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र आहिरे यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने