गुरू रविदास महाराज जयंती अध्यक्षपदी दिलीपभाऊ पाथरे बिनविरोध निवड.....

 गुरू रविदास महाराज जयंती अध्यक्षपदी दिलीपभाऊ पाथरे बिनविरोध निवड..... 



मालेगाव - राष्ट्र संत रविदास महाराज यांची जयंती सालाबादाप्रमाणे या वर्षी देखील १५ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.जयंती उत्सव कार्यकारिणी निवडीसाठी सभा आयोजित करण्यात आली. सभेचे अध्यक्ष जेष्ठ समाजबांधव बाळूभाऊ पवार होते.यासभेत गुरू रविदास महाराज यांची जयंती सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम राबवून साजरी करावी असा ठराव समाजबांधवांनी एकमताने केला.यावेळी मध्यवर्ती अध्यक्षपदी दिलीपभाऊ पाथरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष मनोहर सुरंजे, पंकज पवार कार्याध्यक्ष नंदुभाऊ डावरे, सचिव अंकुश सुरंजे, सहसचिव युवराज आहिरे, कोषाध्यक्ष अमोल तेली, सहकोषाध्यक्ष किरण राजवंशी, स्वागताध्यक्ष देविदास सुरंजे, योगेश पवार, संघटक प्रमुख मोहन सुरंजे,महेंद्र आहिरे,देविदास खरे व प्रसिद्धी प्रमुख मोहन आहिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी जेष्ठ समाजबांधव राजेंद्र काथेपुरी,विठ्ठल बर्वे,संजय सुरंजे,योगेश आहिरे,मनोज राजवंशी,लक्ष्मण पाथरे,ज्ञानेश्वर मेहंदळे,रविभाऊ पवार,किरण सुरंजे,सचिन डामरे व तरुण समाजबांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन रविंद्र आहिरे सर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने