मालेगांव तालुका विज्ञान प्रदर्शनाला शालेय शिक्षणमंत्री मा.ना.दादाजी भुसे साहेबांची भेट...!

 मालेगांव तालुका विज्ञान प्रदर्शनाला शालेय शिक्षणमंत्री मा.ना.दादाजी भुसे साहेबांची भेट...!

 मालेगांव-आज भायगांव, मालेगांव येथील विद्या विकास इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित 2 दिवसीय मालेगांव तालुका विज्ञान प्रदर्शनाला शालेय शिक्षणमंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे साहेबांनी भेट दिली. या विज्ञान प्रदर्शनात मालेगांव तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कल्पक व नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्पांचे सविस्तर निरीक्षण करताना भुसे साहेबांनी प्रत्येक प्रकल्पामागील विद्यार्थ्यांची मेहनत, कल्पकता आणि जिज्ञासेचे कौतुक केले.

यावेळी साहेबांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रकल्पांबाबत सखोल माहिती घेतली. विज्ञान विषयातील त्यांची आवड व कष्ट पाहून साहेबांनी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन केले. तसेच त्यांनी अशा प्रकारच्या प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची आवड वाढते आणि त्यांच्या भवितव्यासाठी नवे मार्ग उघडतात, असे मत व्यक्त केले.  


भुसे साहेबांच्या या प्रेरणादायी भेटीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावला असून, भविष्यात अधिक मेहनत घेण्याचा दृढनिश्चय त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात प्रोत्साहन मिळाले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी नवी उमेद जागृत झाली आहे.

विद्या विकास इंटरनॅशनल स्कूलने आयोजित केलेल्या या विज्ञान प्रदर्शनाची भुसे साहेबांनी प्रशंसा करत शाळेच्या शिक्षकवर्ग व आयोजकांचे देखील कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने