बेटी बचाव,बेटी पढाओ जनजागृती अभियानास सुरुवात...
गर्भनिदान चाचणी करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करणार- आयुक्त रविंद्र जाधव
मालेगाव - साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती नाशिक व मालेगांव महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बेटी बचाव,बेटी पढाओ या जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली.शहरातील काकाणी विद्यालय येथे मनपा आयुक्त रविंद्र जाधव यांच्या हस्ते अभियानाची सुरुवात करण्यात आली.
मालेगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.रविंद्र दशपुते यांच्या हस्ते आयुक्त रविंद्र जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती तर्फे विद्यार्थ्यांसमोर पथनाट्य सादर करण्यात आले. यातून बेटी बचाव ही काळाची गरज आहे.वंशाला दिवा हवा मग पणती का नको,मुलगा मुलगी समान आहेत असा जनसंदेश देण्यात आला.यावेळी श्रीमती सुवर्णा शेफाळ यांनी या अभियानाबद्दल सविस्तर माहिती दिली व मार्गदर्शन केले.आयुक्त रविंद्र जाधव यांनी आपल्या मनोगतातून सदर अभियानास शुभेच्छा दिल्या.त्यांनी सांगितले स्रिया आता सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत.त्यांच्यात भेट करणे अत्यंत दुःखद आहे.ज्या घरात फक्त दोन बहिणी आहेत अशा विद्यार्थिनींचा त्यांनी सत्कार केला. गर्भनिदान चाचणी करणे हा कायद्याने गुन्हा आहे.असे कृत्य करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करून त्यांचा दवाखाना बंद करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.त्यांनी पथनाट्यातील सर्व कलाकारांचा सत्कार केला.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री आहेर,वैद्यकीय अधिकारी फैमीदा मॅडम,श्रीमती पल्लवी शिरसाठ,स्वीय सहायक निलेश पाटील, जनसंपर्क अधिकारी पंकज सोनवणे,डॉ साळुंखे सर तसेच मालेगांव एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष हरिप्रसाद गुप्ता,कोषाध्यक्ष रामनिवास सोनी व संचालक नितीनभाऊ पोफळे,प्राचार्य अनिलकुमार गोविंद,अरुणा देवरे,मुख्याध्यापिका कविता मंडळ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र गुरव व रविंद्र आहिरे यांनी केले.मालेगांव शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्यातुन जनजागृती करण्यात येत आहे.

