दिवंगत पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना सर्वपक्षीय शोकसभेतून श्रद्धांजली....

 दिवंगत पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना सर्वपक्षीय शोकसभेतून श्रद्धांजली.... 

मालेगाव - दि.30 डिसेंबर सोमवार रोजी मराठा दरबार,मालेगांव येथे राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) यांच्यातर्फे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेतून माजी पंतप्रधान व अर्थतज्ञ मनमोहन सिंग यांच्या कार्याना उजाळा देण्यात आला. या शोकसभेत विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटना,शैक्षणिक व वैचारिक संघटनेतील प्रतिनिधी उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ.सिंग यांच्या देशासाठी योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. 1991 च्या जागतिक आर्थिक मंदीत सुद्धा त्यांनी आपल्या देशाला एका भक्कम स्थितीत व मजबूत ठेवले होते.ते खूप कमी बोलायचे असा त्यांच्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आले होते.ते एक जागतिक स्तरावरचे अर्थतज्ञ होते.त्यांचे योगदान हा देश कधीच विसरू शकणार नाही. समारोप श्रद्धांजलीपर मनोगत राजेंद्रभैया भोसले यांनी व्यक्त केले.त्यांनी डॉ.सिंग यांना राजकारणातील एक ध्रुव तारा होते असे सांगितले.त्यांचे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्याना दिशादर्शक ठरेल.एवढ्या उच्च पदावर असून सुद्धा ते शेवटपर्यंत अगदी साधारपणे जगले.प्रत्येकाला काम,शेतकरी कर्ज माफी,अणू करार व आधार कार्ड कायदा असे अनेक महत्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. ते देशासाठी नेहमी दिशादर्शक ठरतील.यावेळी भाजपा जेष्ठ नेते सुरेश नाना निकम,प्रसाद बापू हिरे,रामा मिस्तरी, प्रा.के.एन.आहिरे, संजय दुसाने, अजय शहा,समाजवादी पार्टीचे मुस्तकीम डीग्निटी, ऍड.सुचेता सोनवणे, डॉ.अनिस अहमद अन्सारी, फारुकभाई फिरदौसी, इम्रान इंजिनिअर, प्रा.जगदीश खैरनार, शरद खैरनार, कॉम्रेड मकसूद अन्सारी, जितेंद्र दिसले, रोहिदास उशीरे, संदिप पवार, माजी महापौर निलेश आहेर,सुभाष परदेशी, प्रमोद पाटील, सुनिल वडगे,किशोर इंगळे, दिलीप पाथरे, अनिल पाटील, सागर पाटील, सागर बोरसे आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने