धुळे बस स्थानकाचा होणार कायापालट....
धुळे बस स्थानक होणार सुसज्ज
250 नव्या कोऱ्या ई बसेस धावणार
धुळे -(दि.28 डिसें)- धुळे शहर बस स्थानकाच्या आणि आगाराच्या समस्या लक्षात घेऊन आज आमदार ओमप्रकाश अग्रवाल यांनी बसस्थानकात जाऊन विभाग नियंत्रकांची बैठक घेऊन चर्चा केली .बस स्थानक आणि बस आगारासाठी राज्य शासनाने 30 कोटी रुपये मंजूर केले आहे. या निधीतून सुसज्ज बस स्थानक अस्तित्वात येईल. बस स्थानकात गार्डन ,व्यापारी गाळ्यांची सुविधा असेल .धुळे बस आगाराच्या ताब्यात 250 नव्या कोऱ्या ई बसेस येथील त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे .व्यापारी गाळे देताना कोणावरही अन्याय होणार नाही .सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल .येत्या दोन दिवसात बसस्थानक परिसरात काँक्रिटीकरण केले जाईल त्यामुळे धुळीची समस्या निकाली निघणार आहे. बैठकीत विभाग नियंत्रक विजय गीते उपविभागीय अधिकारी संदेश माने, वाहतूक नियंत्रक सौरभ देवरे, कुणाल सोनवणे, प्रवीण चौधरी तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ओम भैय्या खंडेलवाल मुन्ना आप्पा शितोळे आदी उपस्थित होते. अशी माहिती आ.अनुप ओमप्रकाश अग्रवाल यांनी दिली.

