विषारी गावठी दारू जप्त...

विषारी गावठी दारू जप्त...

धुळे -(दि. 28 डिसें) -धुळे ग्रामीण परिसरात विषारी व गावठी दारू बनवणाऱ्यांची टोळी सक्रिय असल्याचे माहिती होताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धुळे तालुक्यातील अन्वर नाला आणि धनगरवाडी शिवारात छापा घालून पाच हजार ९९० लिटर गुळमिश्रित रसायन आणि २०० लिटर गावठी दारू असा दोन लाख ५२ हजार ९०० रुपये  किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पुढील चौकशी पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.अशा प्रकारे दारू बनवणाऱ्या लोकांवर कठोर कारवाईची लोकांकडून मागणी करण्यात येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने