शालेय शिक्षण मंत्री व कृषिमंत्री यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न

शालेय शिक्षण मंत्री व कृषिमंत्री यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न


श्री. लक्ष्मण तात्या नागरी सहकारी पतसंस्था 

मालेगाव : दि. 27डिसें - मालेगाव तालुका अग्रो डीलर्स असोसिएशन व भारतीय डाळिंब महासंघाच्या वतीने श्री लक्ष्मी नारायण लॉन्स नामपुर रोड येथे महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादासाहेब भुसे व राज्याचे कृषिमंत्री माननीय नामदार माणिकराव कोकाटे यांचा भव्य नागरिक सत्कार ठेवण्यात आला होता. 

यावेळी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, गटसचिव,सरपंच व राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवराम  बापू हिरे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र भैय्या भोसले 

ज्येष्ठ नेते सुरेश नाना निकम, राघो नाना अहिरे,इसाक सेठ जरीवाले, निहाल अहमद अन्सारी, मौलना अर्शद नदवी,अजिज मुकादम,बबीकाका कवडे-नांदगाव नगराध्यक्ष,अनिल अप्पा निकम,अध्यक्ष मालेगाव तालुका ऍग्रो डीलर्स ,संजय बाबुराव निकम, डाळिंब महासंघ, अनंत भोसले, चेअरमन स्व. लखुतात्या नागरी सहकारी पतसंस्था आदी उपस्थित होते.

मनोगत  ऍग्रो डीलर्सचे अविनाश निकम,महात्मा फुले कृषी विज्ञान संकुलाचे अधिष्ठाता संजय  कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब शिरसाठ व सूत्रसंचलन शिवश्री अनिल पाटील  व आभार प्रदर्शन प्रकाश वाघ यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूषण भोसले मित्र परीवार, सागर पाटील,जगदीश खैरनार,रोहिदास उशीरे, अनंत भोसले,किशोर इंगळे,राजू जोशी,अनिल पवार,मनीष पटणी,संजय दशपुते,योगेश पवार,मनोहर शेवाळे,नंदू सोनवणे,बाळू बोरा,संजय नेर,गुलाब निकम मेहनत घेतली.

माणिकराव कोकाटे - 

मला प्रचंड संघर्षातून मंत्रीपद मिळाले आहे.

गेली 28 वर्ष राजकारणात असताना सातत्याने काम केलेले आहे.या मिळालेल्या पदाचा उपयोग शेवटच्या सामान्य घटकापर्यंत करायचा आहे. मागील कामांचा अनुभव आणि असलेला उपजत स्वभाव यामुळे अनेक विषय धडाडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल. 

नाशिक जिल्हा हा क्षेत्रफळाने मोठा असल्याने आमच्या जिल्ह्याची प्रगती योग्य दिशेने करायचे असेल तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे जिल्ह्यातच पाहिजे असे माझे ठाम होत आहे. 

नाशिक जिल्हा बँकेला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी देखील आम्ही सर्व मिळून विशेष प्रयत्न करू. गट सचिवांचे प्रश्न मार्गी लागतील.

दादासाहेब भुसे- आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या तालुक्याला शालेय शिक्षणासारख्या महत्त्वाच्या व प्रमुख खात्याची जबाबदारी मिळालेली आहे. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी अनेक अनुभवी लोकांसोबत बोलणे सुरू आहे. शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल व सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत शिक्षण सहज व सोपे कसे होईल याकडे गांभीर्याने लक्ष देणार आहे. योगायोगाने कृषिमंत्री देखील आपल्याच जिल्ह्यातील असल्याने मागच्या काळात मंजूर झालेली सर्व विकासकामे देखील जलद गतीने मार्गी लागणार आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की ज्याप्रमाणे आपण आपल्या गावाच्या मंदिराला पवित्र मानतो तसेच शाळांना देखील पवित्र मानू त्याकडे प्रत्येक पदाधिकारी नागरिकाने लक्ष दिले पाहिजे सर्वांच्या सहकार्यातून शिक्षणाचा दर्जा वाढणे अधिक सोपे होईल. 

सर्वांना विश्वासात घेऊन मागील काळात ज्याप्रमाणे आपल्या कामाची पद्धत होती त्याच पद्धतीने इथून पुढच्या काळात देखील काम केले जाईल. 

राजेंद्र भोसले- नाशिक जिल्ह्याला मिळालेले शालेय शिक्षण व कृषी हे अशा दोन अनुभवी व लोकांमध्ये रमणाऱ्या नेतृत्वाकडे आहे जे खऱ्या अर्थाने शेतकरी पुत्र आहेत. राजकारणाचा कोणताही वारसा नसताना भुसे व कोकाटे साहेबांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने