शाखा उद्घाटन सोहळा-खडकी
गुरू रविदास समता सामाजिक विचारमंच महाराष्ट्र या सामाजिक संघटनेची शाखा क्रमांक-२ मौजे खडकी ता.मालेगांव जि.नाशिक येथे दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरू करण्यात आली
मालेगांव : (दि.१९ ऑगस्ट) -'गुरू रविदास समता सामाजिक विचारमंच महाराष्ट्र' हि एक सामाजिक व बहूउद्देशीय संघटना आहे.मागील सहा वर्षांपासून संघटनेने अनेक सामाजिक कार्य केले आहेत.याची दखल आता ग्रामीण भागात देखील घेतली जात आहे.चिंचवे येथे प्रथम शाखा सुरू झाल्यानंतर आता खडकी येथे दुसऱ्या शाखेचे उद्घाटन झाले आहे. याप्रसंगी संघटनेची राज्यकार्यकारिणी व खडकी गावातील सरपंच सहित सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्यध्यक्ष मा. दिलीपभाऊ पाथरे,उपाध्यक्ष मा. देविदासभाऊ सुरंजे,सचिव मा. रविंद्र आहिरे, कोषाध्यक्ष मा. राजेश राजवंशी संचालक मंडळ मा. नंदुभाऊ डावरे,मा. अरुण भाऊ कासवे, मा. अमोल तेली, मा. पंकज पवार,मा. रोहित तेली, मा. अमोल आहिरे उपस्थित होते. सदस्य मा. रोशन तेली, मा. मोहन राजवंशी, मा. सचिन डामरे आणि इतर दुसरे गावातील चर्मकार बांधव उपस्थित होते. सैन्यदलातील जवान मा. विशाल भाऊ राजवंशी व मान्यवरांच्या हस्ते शाखेच्या पाटीचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
शाखाध्यक्ष मा. अजय राजवंशी, उपाध्यक्ष मा. योगेश राजवंशी, सचिव मा. दिपक राजवंशी, कोषाध्यक्ष मा. आकाश राजवंशी, कार्याध्यक्ष मा. गणेश राजवंशी, संपर्क प्रमुख मा. सागर राजवंशी, म्हणून कार्यभार सांभाळतील. मा. रोहित तेली यांनी उपस्थित लोकांशी संवाद साधला.
