सौ.रुं.झुं. काकाणी कन्या विद्यालय येथे नागपंचमीनिमित्त सर्प विज्ञान कार्यशाळा संपन्न...
मालेगांव (दि.०२ ऑगस्ट)- सौ.रुं.झुं. काकाणी कन्या विद्यालय येथे नागपंचमीनिमित्त सर्प विज्ञान कार्यशाळा संपन्न झाली. इयत्ता पाचवी ते सातवी साठी दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे श्री. रविंद्र आहिरे सर यांनी नागासंबंधी विशेष माहिती दिली. नागाचे अनेक प्रकार विषारी साप, बिनविषारी साप कसा श्रावण महिन्यातील त्याचे आगमन इतर देवतांप्रमाणे नागाची कशी पूजा केली जाते. पर्यावरणातील नागाचे स्थान संबंधी सामाजिक व वैज्ञानिक सखोल माहिती दिली. तसेच साप चावल्यानंतर कोणते उपाय केले पाहिजे सापाविषयी कोणतीही अंधश्रद्धा बाळगू नये, असेही आवाहन श्री अहिरे सर यांनी केले. साप आपली त्वचा का सोडतो सापाचे आयुष्य किती असते? साप चावल्यानंतर मनुष्याच्या तोंडाला फेस का येतो? साप मनुष्यास का चाव तो ? सापाला पाय का नसतात? सापाचे अन्न कोणते असते? अनेक प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन श्री रवींद्र अहिरे सरांकडून विद्यार्थिनींनी करून घेतले. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर विद्यार्थिनींना खूप माहिती मिळाल्याचा आनंद झाला. आयत्या बिळात नागोबा कसा राहतो?, त्याचे अन्न कोणते असते, आणि साप आपला मित्र कसा असतो, सापाला मारू नये. त्यासंबंधी कोणती उपाययोजना करावी याविषयीची विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली. त्यानंतर माननीय मुख्याध्यापिका सौ शोभा मोरे यांनी श्रावण महिन्यातील नागपंचमीचे महत्त्व सांगितले. श्रावण महिन्यातील पंचमी म्हणजे नागपंचमी हा सण साजरा केला जातो. नाग याविषयीची आपली भावना व त्याविषयीचे समाजात असलेले गैरसमज यासंबंधी माहिती दिली. अरुणा देवरे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
