चंद्रशेखर आझाद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शैक्षणिक साहित्य वाटप....

 चंद्रशेखर आझाद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शैक्षणिक साहित्य वाटप.... 

पेठ- (दि.१८ ऑगस्ट)- आदर्श् समता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चंद्रशेखर आझाद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पहुचिबारी ता.पेठ येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. श्री. हेमंत भामरे व श्री.किरण काळे साहेब यांनी शैक्षणिक साहित्य पुरविले होते. श्री.महेश टोपले (मा.उपसभापती पेठ) व श्री.भास्कर ब्राह्मणे (समन्वयक अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने सदर उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आला. 

यावेळी विद्यालयात ध्वजारोहन करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.श्री. महेश टोपले यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री.अनिल देवरे तसेच सहकारी शिक्षक श्री.विजय पगार, शेवाळे ई.ए.,आहिरे डी.जी.,राठोड व्ही.एच.,घांगळे सी.आर.,कवर एल.व्ही.,पवार आर.एल.,कुवर आर.एम.,गवळी टि.एम.,राठोड पी.पी.,मोरे पी.वाय.यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमासाठी गावातील सरपंच, पोलीस पाटील,ग्रामसेवक व सर्व तरुण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने