लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुस्तके वाटप....
मालेगांव (दि. ०२ ऑगस्ट)- गुरु रविदास समता, सामाजिक विचारमंच मालेगांव तर्फे सत्यशोधक उद्यान संगमेश्वर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मामको बँकेचे चेअरमन श्री. राजेंद्र भोसले व जेष्ठ समाजसेवक सुभाष परदेशी (ताऊभैया) यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. गुरू रविदास मंचाचे उपाध्यक्ष देविदास सुरंजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,"लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेले तरी सुद्धा त्यांनी विपुल प्रमाणात साहित्य लेखन केले,त्यांचे साहित्य हे नेहमी दुर्लक्षित केले गेले आहे.त्यांची पुस्तके घराघरात पोहचविणे हीच त्यांना मानवंदना ठरेल. यावेळी श्री.राजेंद्र भोसले व सुभाष परदेशी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. सयूंक्त महाराष्ट्राचा लढा,गिरणी कामगारांचा लढा,मुंबईतील त्यांचा संघर्ष व रशियाचा प्रवास याबाबतीत विस्तृत माहिती दिली.
जयंती उत्सवासाठी काही शालेय विद्यार्थीनी उपस्थित होत्या,त्यांना 'रशियाचा प्रवास' ही पुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी विचारमंचाचे अध्यक्ष दिलीप पाथरे,कोषाध्यक्ष नंदू डावरे,काकाणी वाचनालयाचे अध्यक्ष संजय शहा,राष्ट्र सेवा दलाचे राज्यसचिव नचिकेत कोळपकर तसेच किरण राजवंशी,अमोल आहिरे,योगेश बागुल,अभिजित सोनपसारे,शुभम थोरात,दिपक आसान उपस्थित होते.सम्राट मंडळ,अंधश्रद्धा निर्मूलन समिती,राष्ट्र सेवा दल व मानव उद्धार फाऊंडेशन यासंघटनेतील सदस्य उपस्थित होते. रविंद्र आहिरे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन केले.
