कुलस्वामिनी महिला गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर.
मालेगाव : (दि.०२ ऑगस्ट): साने गुरुजी नगर,वाणी गल्ली,कॅम्प येथील कुलस्वामिनी महिला गणेश मंडळ यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. मंडळातर्फे दरवर्षी गणपती उत्सव निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येतात. किर्तन, रांगोळी स्पर्धा,व्याख्यान,संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा व उपक्रम राबविण्यात येतात, यावर्षी देखील पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्वानुमते अध्यक्ष म्हणून सौ.पूजा शशिकांत जाधव व उपाध्यक्ष म्हणून सौ.पूजा विशाल भामरे यांची निवड करण्यात आली.