डॉ. वसंतराव गांगुर्डे यांना बगळेश्वर गौरव सन्मान प्रदान...
कालवण-(दि.१८ ऑगस्ट)- नवी बेज ता.कळवण येथील प्रसिद्ध डॉ. वसंतराव दोधु गांगुर्डे यांना आपल्या प्रदीर्घ वैद्यकीय सेवेसाठी 'बगळेश्वर गौरव सन्मान' प्रदान करण्यात आला. डॉ.वसंतराव गांगुर्डे हे मागील 35 वर्षांपासून ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवत असून त्यामाध्यातून समाजसेवा करत आहेत. दिवसाचे 24 तास ते वैद्यकीय सेवा पुरवतात. त्यांच्या वैद्यकीय सेवेचा वसा त्यांचे चिरंजीव व त्यांची सून पुढे चालवत आहेत. हे दोघीही याच गावात वैद्यकीय सेवा देत आहेत. डॉ. वसंतराव गांगुर्डे यांच्या कार्याची दखल घेत दि. 15 ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्यदिनी 'बगळेश्वर सन्मान समिती, बगडू' यांनी डॉ. वसंतराव गांगुर्डे यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी डॉ. गांगुर्डे यांनी समाधान व आनंद व्यक्त केले.
