पाताळेश्वर माध्यमिक विदयालय हे पुस्तकाचं भांडार-प्रा.शहाजी पाचोरे साहित्यिक नारायणगाव पुणे

पाताळेश्वर माध्यमिक विदयालय हे पुस्तकाचं भांडार - प्रा.शहाजी पाचोरे साहित्यिक नारायणगाव पुणे 

पाडळी: (दि.२७ जुलै)- पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयास फार मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकांचा साठा असून अनेक मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी शाळेला आपल्या वाढ दिवसा निमित्त पुस्तके भेट दिली.आपणही यात मागे राहू नये म्हणून कै.तारामती पांडुरंग पाटोळे व कै.पांडुरंग केरू पाटोळे (निवृत्त तहसीलदार) यांच्या स्मरणार्थ पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयासाठी पाचशे पुस्तके व पुस्तक सुरक्षित ठेवण्यासाठी कपाट भेट दिली.

श्री. शहाजी चंद्रभान पाचोरे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून पुस्तके व पुस्तकांसाठी कपाट भेट दिली.विद्यालयात राबविले जाणारे वाचनालयाचे उपक्रम म्हणजे वाचनालय आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या वाचनात भर पाडावी म्हणून पुस्तके देण्याचा हा संकल्प आहे. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील घडलेल्या घटनांचा मागोवा घेत आपल्या पत्नीने लग्नानंतर शिक्षण पूर्ण करून शिक्षिका होणे व संसारातही त्यांची अनमोल साथ मिळाली.

        मनात जी कीचन वाचनालयाची संकल्पना आहे ती पूर्ण करेल.ज्या-ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे त्यांना मार्गदर्शन करेल.यावेळी बोलतांना त्यांनी विविध उदाहरणे देऊन बिरबल कसा श्रेष्ठ आहे हे सांगितले. आयुष्यात नेहमी वाचन करा घरी आई वडिलांना वाचता येत नसेल तर वाचून दाखवा असे सांगितले.पुस्तके हे मानवाचे खरे मार्गदर्शक होय.ज्यामुळे आपण ज्ञानाचे डॉक्टर होऊन आपले ज्ञान जनसामान्यापर्यंत पोहचविण्यास पुस्तके मदत करतात असे डॉ.शशिकांत पाटोळे यांनी सांगितले. 

बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री.राहुल सोनवणे  यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले वाचाल तर वाचाल त्यामुळे नेहमी वाचनाची सवय ठेवा.जीवनात कितीही खडतर प्रसंग आले तरी त्याचा सामना आपण करू शकतो.उच्च शिक्षण घ्या व आपल्या सोबत घरच्यानाही वाचन करण्यास प्रोत्साहन द्या असे सांगितले.

पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात श्री एस.सी.पाचोरे यांनी विद्यालयास पुस्तके भेट देऊन उपकृत केले.याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी पाचोरे सर व माझी बऱ्याच वर्षाची मैत्री पाचोरे सर नेहमी वाचनात दंग व सेवापूर्ती नंतर त्यांना कीचन वाचनालय सुरु करावयाचे निश्चितच हा उपक्रम उल्लेखनीय आहे व घरातील स्त्रिया सुद्धा वाचन उपक्रमा पासून वंचित राहणार नाही यात त्यांच्या सुविध्य पत्नी सौ.जोत्सनाताई पाचोरे यांचाही मोलाचा वाटा आहे हाच उपक्रम गावात राबविणार असल्याचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी सांगितले.

बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.टी.एस.ढोली यांनी विद्यार्थ्यांना वाचाल तर वाचाल विद्यार्थ्यांनी वाचनाचे शौकीन झाले पाहिजे वाचनामुळे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होतात म्हणून जीवनात वाचनालयाचा आधार घेऊन वाचन संस्कृती वाढविली पाहिजे.

या कार्यक्रमासाठी शहाजी पाचोरे यांच्या मातोश्री प्रयागा पाचोरे यांच्या हस्ते वाचनालयाचे पुस्तके व वाचनालय कपाट विद्यालयास भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल सोनवणे, उपाध्यक्ष प्रा.टी.एस.ढोली, सेक्रेटरी एस.बी.देशमुख, सहसेक्रेटरी अरुण गरगटे, कोषाध्यक्ष टी.के.रेवगडे, संचालिका मंजुषा ढोली, मनिषा रेवगडे, ज्योत्सनाताई पाचोरे,डॉ.शशिकांत पाटोळे, डॉ.अर्चना पाटोळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी श्री शिक्षक बी.आर.चव्हाण,आर.व्ही. निकम,एस.एम.कोटकर, आर.टी. गिरी, एम.सी.शिंगोटे, एम.एम.शेख, सौ.सविता देशमुख, टी.के.रेवगडे, सी.बी.शिंदे,के.डी. गांगुर्डे,एस. डी.पाटोळे, आर.एस.ढोली, ए.बी.थोरे हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने