नवीन प्राथमिक शाळा किल्ला तर्फे सत्यशोधक उद्यानास भेट
मालेगांव (दि.२० जुलै): काल दिनांक १९ जुलै रोजी नवीन प्राथमिक शाळा किल्ला येथील इयत्ता ३ री व ४ थीच्या विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त संगमेश्वर येथील 'सत्यशोधक उद्यानास' भेट दिली. सत्यशोधक उद्यानात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 'हि पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नसून,कष्टकरी,शेतकरी व कामगारांच्या तळहातावर तोलली गेली आहे.' याविधानावर संकल्पित 'स्टेचू ऑफ एफर्ट मॅन' 'कामगार पुतळा' निर्माण करण्यात आला आहे. या पुतळ्याबद्दल उपशिक्षक रविंद्र आहिरे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. देशातील कष्टकरी, शेतकरी व कामगारांच्या मेहनतीचे महत्व पटवून दिले.
सत्यशोधक उद्यानात जेष्ठ समाजसेवक मा.सुभाष परदेशी यांनी शेकडो प्रकारच्या औषधी वनस्पती व विविध फुलझाडे लावली आहेत. यात बेहडा, फणस, पुत्रांजीवी, डिकामवली, निवडुंग, चांद, खैर, निळा गुलमोहर, अस्मनतारा, गुळवेल, बोगणवेल, कोरपड, रानतुळस अशा विविध प्रकारच्या वनस्पतींची लागवड याउद्यानात करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना या वनस्पतींची माहिती सुभाषजी परदेशी व जसवंत माळी यांनी दिली तसेच रमेश सोनवणे यांनी सहकार्य केले. यावेळी उपशिक्षक कु. अविनाश निकम व शिक्षकेत्तर कर्मचारी सौ. अनिता ईंगळे यांनी परिश्रम घेतले. समारोपाला विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.
