(बातम्या व जाहिरातीकारिता आमच्याशी संपर्क करा - मो. ७४९९७१२२३६)
पेट्रोल व डिझेल 'एवढ्या' रुपयांनी झाले स्वस्त - पहा सविस्तर बातमी
मुंबई (दि.१५ जुलै) - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना दिलासा देणारी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत पेट्रोल-डिझेलच्या दरकपातीची घोषणा करण्यात आली. यामुळे महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलच्या व्हॅट करात कपात केलेली असून पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त करण्यात आलेले आहे. असा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहे. या राज्य सरकारच्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना बराचसा दिलासा मिळाला आहे.
Tags:
मुंबई

