सौ.रु.झुं.काकाणी कन्या विद्यालयात गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

GRP News महाराष्ट्र (बातम्या व जाहिरातीकरिता आमच्याशी संपर्क करा- ७४९९७१२२३६)

सौ.रु.झुं.काकाणी कन्या विद्यालयात गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

मालेगांव (दि.१३ जुलै) - मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित सौ. रु. झुं. काकाणी कन्या विद्यालयात दोन्ही सत्रात गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. मुख्याध्यापिका सौ. शोभा मोरे मॅडम आणि पर्यवेक्षक श्री. राजेश परदेशी सर यांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.सकाळ सत्रात इ. ९ वी (ब) च्या  तर दुपार सत्रात इ. ७ वी (अ)च्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे सादरीकरण केले. कु यामिनी मोरे, सलोनी चव्हाण,सकाळ सत्रात तर कु. तनुश्री पाटील व श्रृती बच्छाव यांनी दुपार सत्रात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. एकनाथ अहिरे सर यांनी केले त्यांनी गुरूची महती,जीवनात गुरुचे स्थान,इतिहासातील गुरू शिष्य जोड्या याविषयी माहिती दिली.सौ मनीषा अहिरे मॅडम यांनी आपल्या मनोगतात आई वडील हेच आपले प्रथम गुरु ,थॉमस एडिसन व त्यांच्या आईविषयी माहिती सांगीतली.सौ.अरुणा देवरे मॅडम यांनी गुरूच्या आज्ञेपुढे स्वतःला झोकून देणारा शिष्य अरूणी यांची कथा,श्री.शर्मा सर यांनी गुरूपौर्णिमेचे महत्त्व सांगितले.

           आदिती देव,अंतरा सुमराव या विद्यार्थिनींनी इंग्रजीत तसेच अनुष्का देवरे,सृष्टी अहिरे यांनी संस्कृत भाषेतून  व तनया गुरव,संस्कृती पगार,धनश्री चंद्रात्रे, लावण्या लोधे, पल्लवी माळी, मनस्वी अभोणकर, अनुष्का पवार, श्रद्धा जाधव, परी पांडे, तेजश्री चौधरी, पौर्णिमा पाटील, मृदुला भोये, दुर्वा सांळूके, कल्याणी खैरनार, भूमी विसपुते, नंदिनी माळी, अनन्या पाटील, रोशनी हिरे, रोशनी सैंदाणे, तनिष्का आहेर, दीपाली पवार, देवयानी शेवाळे, अनन्या वडनेरे, या विद्यार्थिनींनी  गुरूपौर्णिमा,गुरू यांचे महत्त्व,आपले आईवडील,गुरुजन यांच्या प्रती आदर आपल्या मनोगतात व्यक्त केला.अध्यक्षीय भाषणात सौ. मोरे मॅडम यांनी द्रोणाचार्य एकलव्य यांची कथा, वाकून नमस्काराचे महत्त्व,शिष्याच्या अंगी नम्रता गुण आवश्यक तर परदेशी सरांनी गुरुजन ,आईवडील, वडीलधाऱ्यांचा आदर,गुरूची शिकवण याविषयी माहिती सांगितली सर्व गुरुजनांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.कु श्रावणी ब्राह्मणकर हिने आभार मानले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.  तसेच विद्यालयात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गरजू विद्यार्थिनींना चित्रकला वह्या ,शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने