मालेगांव शहरातील पाणी पुरवठा चोवीस तास खंडित राहणार - पाणी 24 तासाकरिता SHUT DOWN
दिनांक:- ११/०७/२०२२
पाणी पुरवठा विभाग
प्रेसनोट क्रं.७७
मालेगाव शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, गिरणा धरण येथुन येणारी पाईप लाईन उंबरदे गावाजवळ व दहीवाळ गावातुन येणा-या पाईप लाईन दहीवाळ गावात लिकेज झालेली आहे. व व्हॉल्व नं. ३६ मधुन मोठ्याप्रमाणात पाणी गळती होत आहे. तसेच पाणी पुरवठा विभागाशी निगडीत अत्यावश्यक विद्युत देखभाल दुरुस्तीचे कामे करणे आवश्यक आहे. त्यामुळे सदरचे काम लवकर लवकरात करणे अत्यंत आवश्यक असल्याने उक्त कामासाठी २४ तासांकरीता Shut Down करावा लागणार आहे.
सदरचे काम करणेकामी दि. १६/०७/२०२२ (शनिवार) रोजीचा शहरातील पाणी पुरवठा २४ तास खंडीत होणार आहे. त्यानंतर दैनंदिन पाणी पुरवठा एक दिवस आड करण्यात येईल. गिरणा धरण येथे Shut Down घेतल्याने दि.१६/०७/२०२२ रोजी नियोजित पाणी पुरवठा हा दि. १७/०७/२०२२ रोजी तसेच १७/०७/२०२२ रोजीचा पाणी पुरवठा करण्यात दि. १८/०७/२०२२ रोजी करण्यात येईल. याची नागरीकांनी नोंद घ्यावी.
तरी नागरीकांनी वरील तांत्रिक अडचणी विचारात घेऊन उशीराने होणाऱ्या पाणीपुरवठया बद्दल मालेगाव महानगरपालिकेस सहकार्य करावे. व पाणी जपुन वापरावे.
(स्वाक्षरीत/-)
आयुक्त
मालेगाव महानगरपालिका,मालेगाव.
