आई फाउंडेशनच्या दातृत्वातून दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वाचनालयास पुस्तके भेट - GRP NEWS महाराष्ट्र

आई फाउंडेशनच्या दातृत्वातून दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वाचनालयास पुस्तके भेट 

सिन्नर ( दि. ११ जाने) :- पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आई फाउंडेशन नाशिक यांच्याकडून स्कूल बॅग सह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले . आई फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सौ. भारती विधाते यांच्या हस्ते विद्यालयातील ओम किरण रेवगडे, धनश्री पोपट आव्हाड, गोकुळ पंढरी राऊत, आदित्य संतोष आव्हाड, माधुरी शिवाजी पाटोळे, पायल संजय जाधव या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले जयंती सप्ताहानिमित्त वाटप करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या वाचनालयासाठी विद्यार्थी उपयुक्त गोष्टींची पुस्तके सौ . भारती विधाते यांच्या स्वखर्चातून देण्यात आले.  यावेळी आई फाऊंडेशनच्या जिल्हा अध्यक्षा छाया फलाणे, आई फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष महेशजी आडके , प्रहार संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख दत्तूभाऊ बोडके, अॅड .राहुल रोकडे, खंडूभाऊ  बिन्नर यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.


यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एस.बी. देशमुख यांनी आई फाउंडेशन ही सेवाभावी संस्था असून कोविड१९ च्या महामारीत पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सीजन सिलेंडर देणे, रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देणे , रुग्णांसाठी सेवा पुरवण्याचे काम महाराष्ट्र आई फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सौ. भारती विधाते यांच्या माध्यमातून केले शनिवार दि. ८ जाने २०२२ रोजी झालेल्या कार्यक्रमासाठी शाळा समितीचे चेअरमन चंद्रभान रेवगडे, भगिरथ रेवगडे, सुरेखा रेवगडे, सुरेखा बोगीर, निर्मलाताई रेवगडे तसेच शिक्षक श्री चव्हाण बी.आर, श्री निकम आर.व्ही,श्री कोटकर एस.एम, श्री गिरी आर. टी, श्री शिंगोटे एम.सी, श्रीमती शेख एम.एम, सौ.सविता देशमुख, श्री रेवगडे टी.के, शिंदे सी.बी, श्री गांगुर्डे के.डी, पाटोळे एस.डी, ढोली आर.एस, थोरे ए. बी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने