गुरू रविदास जयंती उत्सव समिती नुतन कार्यकारिणी निवड संपन्न....

गुरू रविदास जयंती उत्सव समिती नुतन कार्यकारिणी निवड संपन्न

मालेगांव- (दि. ९ जाने) - राष्ट्रसंत गुरू रविदास महाराज यांची जयंती दि. १५ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने आज कर्मवीर या.ना.जाधव विद्यालय येथे बैठक संपन्न झाली. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक श्री. अशोक आहिरे होते व प्रमुख पाहुणे म्हणून मावळते अध्यक्ष लक्ष्मण पाथरे, बाळूभाऊ पवार, दिलीप पाथरे उपस्थित होते. यानंतर गुरू रविदास जयंती उत्सवासाठी नुतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. मालेगांव शहराच्या इतिहासात प्रथमच जयंती उत्सव कार्यकारिणीत महिलांचा समावेश करण्यात आला. कोविड परिस्थिती लक्षात घेऊन गुरू रविदास महाराज यांची जयंती विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन साजरी करण्याचा मानस यावेळी करण्यात आला आहे. याप्रसंगी शहरातील संगमेश्वर, मोची कॉर्नर, कॅम्प, कलेक्टर पट्टा, चंदनपुरी गेट,सोयगाव व भायगाव शिवार येथील समाजबांधव व महिला उपस्थित होते.नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- 

अध्यक्ष-किरण राजवंशी,उपाध्यक्ष-अंकुश सुरंजे,सचिव-सौ.अश्विनी आहिरे,सहसचिव-सचिन डामरे, कोषाध्यक्ष-सौ.कविता पाथरे, सहकोषाध्यक्ष- राजेश राजवंशी, कार्याध्यक्ष- देविदास सुरंजे, सहकार्याध्यक्ष- अमोल आहिरे, सल्लागार- सौ.लक्ष्मी सुरंजे, सौ.ज्योती पाथरे, जेष्ठ सल्लागार- श्री. बाळू पवार, भारत सुरंजे, मोहन सुरंजे कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र आहिरे यांनी तर सूत्रसंचालन रोहित तेली यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने