साई इंटरनॅशनल स्कूल ज्युनिअर कॉलेज लखमापूर येथे राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी

साई इंटरनॅशनल स्कूल ज्युनिअर कॉलेज लखमापूर येथे राजमाता जिजाऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती  विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी


मालेगांव (दि. १३ जाने ) :  दि. १२ स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिवस आणि आई साहेब जयंतीचे निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान इ.१० वी व १२ वी च्या विद्यार्थी त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी शाळेचे शिक्षक प्रा.सुरेंद्र हांडे यांनी विवेकानंदांच्या शिकागो येथील भाषणातील काही भाग सदर केले.  प्रा.तुषार निकम यांनी आपल्या मनोगतात राजमाता जिजाऊच्या व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली. प्रा.विनोद चंदन यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी जिवनातील प्रेरक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगुन त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपले शालेय जीवन योग्य प्रकारे विकसित करावे असे सांगितले कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अँन्ड शशिकांत अहिरे व शाळेचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने