अजंग-स्वामी विवेकानंद स्कूल फॉर एक्सलंस येथे पत्रकार दिन साजरा

अजंग-स्वामी विवेकानंद स्कूल फॉर एक्सलंस येथे पत्रकार दिन साजरा.....

वैभव सोनवणे /मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी

मालेगाव तालुक्यातील अजंग  येथे स्वामी विवेकानंद स्कूल फॉर एक्सलंस मध्ये पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव श्रीमती. रिंकु साेनवणे, निलम सोनवणे तर अध्यक्ष एम. आर साेनवणे,प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संतोष कांबळे, महेंद्र अहिरे, वैभव सोनवणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सिमा कुलकर्णी व संस्थेच्या कॉडिनेटर अंजली पवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी  परिसरातील पत्रकार यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी शाळेच्या मोठ्या विदयार्थीिनिंनी डॉक्टर, शिक्षक यांच्या मुलाखती घेतल्या त्यांचे विडियो कार्यक्रमात दाखवण्यात आले. पत्रकाराचे महत्व काय आहे हे राधिका मॅडमांनी पटवून सांगितले. विद्यार्थिनींनी प्रत्यक्षात  डॉक्टरांचा प्रवास कसा चालतो त्यासाठी काय भूमिका आहे. या संदर्भात नामवंत शिक्षक, डॉक्टर यांच्या मुलाखती घेऊन प्रत्यक्षात पत्रकाराचा अनुभव स्वामी विवेकानंद स्कुल मधील विदयार्थ्यांनी राबवला. तसेच पत्रकार संतोष कांबळे सर शाळेचे अध्यक्ष एम.आर.सोनवणे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व संस्थेच्या कॉडनेटर अंजली निकम यांनी आभार मानले. यावेळी आरती सोनवणे, आकांक्षा पवार, साधिका मॅडम, शेलार ज्योती, खैरणार सरला, ऊशिरे मृगनयन, वैभव सोनवणे, माळी पवार राशी, नेरकर जयश्री, मांडवडे डिंपल, अश्विनी बागुल कृतिका पवार आदी उपस्थित होते



.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने