के.बी.एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वडेल येथे विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण
वैभव सोनवणे /मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी
मालेगांव : दि. (१० जाने) १० जानेवारी सोमवार रोजी विद्यालयाचे के.बी.एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वडेल येथे प्राचार्य श्री.एस. के. शिरोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण करण्यात आले.शासनाच्या आदेशान्वये १५ ते १८ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांना कोव्हॅक्सीन लस देण्याची मोहीम संपूर्ण देशात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेने होत आहे. या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र करंजगव्हाण केंद्रातील आरोग्य अधिकारी श्रीमती डॉ. हर्षदा कदम मॅडम व आरोग्य सेवक तात्यासाहेब पवार यांच्या उपस्थितीत. के. बी. एच. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वडेल ता. मालेगाव येथे विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याची सुरुवात करण्यातकरण्यातर आली. सुरुवातीस वडेल गावाचे सरपंच श्री. नरेद्र सोनवणे उपसरपंच सौ. प्रमिला महाले ग्रामविकास अधिकारी वाघ साहेब व आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आशा सेविका, यांचा विद्यालयाच्या वतीने श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन प्राचार्य श्री एस. के. शिरोळे सर व पर्यवेक्षक श्री.बी. डी. सोनवणे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ. हर्षदा कदम यांनी विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्व आणि आरोग्या बाबत घ्यावयाची काळजी तसेच वाढत असलेला कोरोना याबाबत मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सिग पाळणे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री के.बी. अहिरे यांनी मानले.