गरबड गावात दारूबंदी करण्यात यावी आदिवासी महिलांनी उभारला लढा
मालेगांव (दि. १३ जाने) : मालेगाव तालुक्यातील गरबड या आदिवासी लोकवस्तीच्या गावात संपूर्ण दारूबंदी करण्यात यावी असे निवेदन गरबड गावातील सरपंच, आदिवासी संघटना कार्यकर्ते व महिलांनी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब यांना देण्यात आले. त्यावेळी सरपंच चिंतामण भांगरे,गोरख नाडेकर, गोरख भांगरे,समाधान गुमाडे,वसंत भांगरे, गोविंदा गुमाडे, जितेंद्र रगतवान, भीमा भांगरे, विष्णू गुमाडे व नागेश गुमाडे हे पुरुष तर निर्मला सोनवणे, राधा नाडेकर, शोभा बेंडकुळे, तुळसा भांगरे, गंगूबाई सोनवणे, मालाबाई सोनवणे, राधा गुमाडे, रोहिणी भांगरे, वैशाली सबगर, लंकाबाई घोडे, अनिता नरवाडे, रमाबाई भांगरे, ताईबाई भांगरे, संगीता गोंदे, वैशाली भोईर, सुवर्णा नाडेकर, हिराबाई बनकर, सविता बनकर, शकुंतला नाडेकर, रत्ना नाडेकर, सुशीला सबगर, गोदा भांगरे, सरला गुमाडे या महिलांनी स्वतः उपस्थित राहून निवेदन दिले आहे.सदर निवेदनात म्हटले आहे की, गरबड गावात अवैध गावठी दारूचे उत्पादन व विक्री मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे गावातील तरुण मुले मोठ्या संख्येने व्यसनाधीन होत आहेत. कुटुंबातील सदस्यांना त्रास देणे, गावातील जेष्ठ नागरिकांना अपमानास्पद बोलणे, गावात वाद वाढत आहेत.अशा घटना गावात अवैध दारूच्या उत्पादन व विक्री यामुळे वाढत आहेत तरी यावर कारवाई करून गावातून अवैध दारू उत्पादन व विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी गरबड ग्रामपंचायत व गावकर्यांची मागणी आहे.