रोटरी मिडटाऊनतर्फे अनाथ लेकरांना ऊब ; अंजुमन दारूल अनाथाश्रमात ३७ ब्लँकेट वाटप
वैभव सोनवणे /मालेगांव तालुका ग्रामीण प्रतिनिधी
मालेगाव (दि.१६ जाने) : वाढत्या थंडीमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिडटाऊन व शहा परिवारातर्फे अंजुमन दारूलफलाह अनाथाश्रमातील ३७ बालकांना ऊब देत ब्लॅंकेंटचे वाटप करण्यात आले. सरलाबेन शहा यांच्या सहकार्याने या लेकरांना ही ब्लॅंकेंट रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. टी. पी. देवरे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष राजेंद्र दिघे , प्रकल्प संयोजक सचिन शहा , सोहेल मुसानी उपस्थित होते. यावेळी सचिन शहा, राजेंद्र दिघे, डॉ. टी. पी. देवरे यांनी मुलांशी संवाद साधला. चांगले शिक्षण घेण्याचे आवाहन केले . अंजुमन संस्थेच्या पदाधिकारी यांनी रोटरी व शहा परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी वकील अन्सारी, हाफीज शेख, कल्लु उस्ताद, अरिफ भाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.