काकाणी विद्यालयात राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

काकाणी विद्यालयात राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

मालेगाव (दि. १३ जाने) - मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित श्री.रा.क.काकाणी कनिष्ठ महाविद्यालय व झुं.प.काकाणी विद्यालयात सकाळ व दुपार सत्रात राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यालयातील ओम किरण अक्कर या विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंदांचे स्वरूप साकारून प्रत्येक वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांच्या विचारवाणी चे संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले. कार्यक्रमाला प्रशासकीय प्रमुख व कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.शुभांगी अस्मर यांनी आपल्या मनोगतातून शिवरायांना संस्कार देणार्या व राष्ट्र घडवणार्या अशा राजमाता जिजाऊ आईसाहेब यांची महती विद्यार्थ्यांना सांगितली. तसेच स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेऊन युवकांनी विविध क्षेत्रात प्रचंड इच्छाशक्तीनिशी यश प्राप्त केले तरच युवादिन सार्थकी होईल असे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्य श्री.तुकाराम मांडवडे यांनी देखील आपले विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले व युवा दिनाचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी १०वी (ब) चा विद्यार्थी जयेश अजय पवार व १२ काँमर्स ची विद्यार्थिनी काजल गणेश खैरनार यांनी दोन्हीही महापुरुषांबद्दल आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री अनिल गोविंद, ज्येष्ठ शिक्षक किशोर गोसावी व सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने