मालेगाव जिल्ह्याच्या स्थानिक निवडणुकांना नक्की येणार - प्रवीण दरेकर
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची टेहरे येथील हुतात्मा स्मारकाला भेट
मालेगाव (दि. २९ जाने) : येथील भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्ह्याचा स्थानिक निवडणुकांना बोलवा नक्की येणार असे आश्वासन विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी जिल्हाध्यक्ष सुरेश निकम यांना दिले. नासिक, मालेगाव, धुळे, साक्री दौऱ्यावर असलेले दरेकर यांनी आज टेहरे येथील हुतात्मा चौक येथे भेट दिली या दरम्यान जिल्हाध्यक्ष व पं.स. सदस्य अरुण पाटील यांच्याशी मालेगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका बाबत चर्चा केली. व येथील पावन हुतात्मा चौकाला आगळ वेगळं महत्व असल्याचे दरेकर यांनी बोलून दाखवले. तसेच सर्व पदाधिकारींची व्यक्तीशा विचारपूस करत आगामी कार्यक्रमा बाबत देखील माहिती घेतली. यावेळी सुरेश नाना निकम, अरुण पाटील, मुकेश झुनझुनवाला, देवा पाटील, सुधीर जाधव, जे पी बच्छाव, श्याम गांगुर्डे, स्पप्रिल भदाणे, मिलिंद पाटील, सागर पाटील, निलेश शैवाळे, दिनेश पाटील, भुषण पवार शिवदास देवरे, सुनिल शैवाळे, रुपेश पाटील, आदी उपस्थित होते.