स्वामी विवेकानंद स्कूल फॉर एक्सलंस अजंग येथे 73वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

स्वामी विवेकानंद स्कूल फॉर एक्सलंस अजंग येथे 73वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा......

वैभव सोनवणे /मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी

मालेगाव (२६ जाने) : मालेगाव तालुक्यातील अजंग  येथे स्वामी विवेकानंद स्कूल फॉर एक्सलंस मध्ये 73 वा प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माजी शिक्षक  एस. के माेरे याच्या हस्ते ध्वजाराेहन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  एम. आर साेनवणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सिमा कुलकर्णी व संस्थेच्या कॉडिनेटर अंजली पवार आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रमुख अतिथींनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्य घटनेचा स्विकार करण्यात येवून खऱ्या अर्थाने आपण लोकशाहीचा स्विकार केला. प्रत्येकास विचार, अभिव्यक्ती, विचार स्वातंत्र्य मिळाले म्हणून आपण सर्वांनी याचा आदर केला पाहिजे. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर बंधुभगिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपशिक्षिका शेलार मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शनाने आरती साेनवणे यांनी कार्यक्रमाची सांगता केली. उपास्थित शिक्षक वर्ग, आकांक्षा पवार, साधिका मॅडम, शेलार ज्योती,उशीरे मृगनयन , वैभव सोनवणे आदी उपस्थित होते.

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने