घराच्या छतासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावला हातभार
वैभव सोनवणे /मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी
मालेगाव (दि. १७ जाने) : मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील गायकवाड वस्तीत राहणाऱ्या विधवा महिलेच्या घराला संक्रांतीच्या दिवशी सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रे दिल्याने घराला छप्पर मिळाले. रावळगावला गायकवाड वस्तीत राहणारे आदिवासी समाजातील कैलास गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांची विधवा पत्नी अंबिकाबाई कैलास गायकवाड व त्यांचा परिवार उघड्यावर पडला होता. त्यांना मदतीची गरज होती . अशा वेळेस मदतीचा हात म्हणून रावळगाव शहर भारतीय जनता पक्ष यांच्या माध्यमातून सातमाने व्यसनमुक्ती केंद्राचे डॉ . दीपक जाधव यांच्या सहकार्याने त्यांना त्यांच्या हक्काच्या घराच्या छप्परासाठी निवारा देण्यात आले. संक्रांतीनिमित्त साडी-चोळी व तिळाचे लाडू देऊन त्यांची संक्रांत गोड करण्यात आली. डॉ. दीपक जाधव, कैलास अहिरे, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल कानडे, भाजप शहर अध्यक्ष पंकज कासार, सुनील अहिरराव, सोमनाथ बनकर, सागर बागूल, राजू बोरसे, विनोद सूर्यवंशी, प्रशांत अहिरे, उमेश शिंदे, बाळा मासूळ, प्रशांत संसारे, भगवान गायकवाड, रमेश गायकवाड, जयसिंग गवळी, आकाश शिरोडे, हरीश जाधव, पंकज साळुंखे, बापू हिरे व रावळगाव शहर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.