मा.ए.सोसायटीचे सेक्रेटरी आदरणीय श्री.सतीशजी कलंत्री यांच्याकडून त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ वाँटर प्युरिफायरची भेट

मा.ए.सोसायटीचे सेक्रेटरी आदरणीय श्री.सतीशजी कलंत्री यांच्याकडून त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ वाँटर प्युरिफायरची भेट

मालेगाव (दि. ०३ जाने २०२२) -दि. १ जानेवारी  २०२२ शनिवार रोजी नववर्षाचे औचित्य साधून संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री.सतीशजी कलंत्री यांनी त्यांच्या मातोश्री स्व.कमलाताई रामकिसनजी  कलंत्री यांच्या पुण्यतिथी निमित्त झुं.प.काकाणी विद्यालय  व सौ.रुं.झुं.काकाणी कन्या विद्यालयांना वॉटर प्युरिफायरची भेट दिली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य.मा.श्री.संजयजी पाठक  उपस्थित होते.  तसेच संस्थेचे अध्यक्ष  डॉ.श्री.विलासजी पुरोहित, चेअरमन श्री. प्रकाशजी दातार, कोषाध्यक्ष श्री. रामनिवासजी सोनी, व्हा.चेअरमन श्री. राजेंद्रभाई अमिन व संस्थेच्या तीनही शाळांच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आपल्या मनोगतात बोलताना श्री. संजय पाठक यांनी आपल्या संस्कृतीत दातृत्व गुणांचे महत्त्व आहे.आणि त्याच दातृत्वाचा वारसा घेऊन श्री.सतीशजी कलंत्री आपले कार्य करत आहेत असे सांगितले. आईच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला उत्तर देताना श्री.सतीशजी कलंत्री यांनी आईचे उपकार विशद केले. आईचे ऋण आपण कुठल्याही परिस्थितीत फेडू शकत नाही. असे त्यांनी आपल्या मनोगतात नम्रपणे नमूद केले. कोषाध्यक्ष श्री.रामनिवासजी सोनी यांनी देखील आपले मनोगत यावेळी व्यक्त  केले.तसेच प्रभारी प्राचार्या सौ. शुभांगी अस्मर यांनी आई हे दैवत प्रत्येक घरामध्ये आहे व तिची आपण सदोदित काळजी घेतली पाहिजे असे आपल्या भाषणातून व्यक्त .विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती स्मिता पाटील यांनी श्री.सतीशजी कलंत्री यांनी त्यांच्याआईवर तयार केलेल्या कवितेचे वाचन केले. पसायदानाने कार्यक्रमाची समाप्ती झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने