काकाणी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

 काकाणी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

मालेगाव (दि. ०४ जाने)- मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित श्री. रा. क. काकाणी कनिष्ठ महाविद्यालय व झुं.प.काकाणी विद्यालयात सकाळ व दुपार सत्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान नगरसेविका ॲड. ज्योतीताई भोसले उपस्थित होत्या.कार्यक्रमाला प्रशासकीय प्रमुख व कार्यक्रमाच्या अध्यक्षा अस्मर मॅडम उपस्थित होत्या. पर्यवेक्षक श्री अनिल गोविंद व सर्व सहकारी प्राध्यापक उपस्थित होते. ज्ञानज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार प्रमुख पाहुण्यांनी अर्पण केला. व कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या ओघवत्या विचारातून ज्योती ताई भोसले यांनी मुलामुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आजही 30 टक्के लोकसंख्या अशिक्षित आहे, अडाणी आहे. जोपर्यंत सर्व भारत साक्षर होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंना आदरांजली देता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाला शिक्षण मिळावे व समस्त समाज साक्षर गुणवंत ज्ञानवंत करण्याचे त्यांनी आवाहन केलेकार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बागले सर यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ.निकवेलकर मॅडम यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची निवड श्री सोनवणे सरांनी करून दिली. या कार्यक्रमांमध्ये भावेश कैलास बागुल, वैभव कमलेश पगार, प्रसाद दत्तात्रय रोकडे, श्रीहरी दीपक सोनार, स्वामी सोमनाथ डांगचे, सिद्धेश मनोज शेटे, हर्शल दादाजी जाधव, समर्थ अनिल अभोनकर, समर्थ हरीश भडांगे, जयेश कैलास खैरनार, दिव्यम अतुल ठोंमरे, पियुष शंतनु भुसे, वेदांत दीपक नागमोती या विद्यार्थ्यांनी भाषण केलीत. सूत्रसंचालन श्री ठोंबरे सरांनी केले आपल्या अध्यक्षीय मनोगतात  बोलतांना प्राचार्या शुभांगी अस्मर म्हणाल्या जे समाजात कार्य करतात, समाजासाठी आयुष्य वेचतात, त्यांची जयंती साजरी होते. आपण समाजासाठी योगदान दिले पाहिजे असं आवाहन त्यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे आभार प्राध्‍यापक घनश्याम अहिरे यांनी व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने