अखेर मालेगाव आगारातून लाल परी धावली
वैभव सोनवणे /मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी
मालेगाव : गेले ५४ दिवस असलेल्या एसटी कर्मचारी संपामुळे रुतलेली लाल परीची चाके गुरुवारी गतीमान झाली. मालेगाव मध्यवर्ती बस स्थानकातून पोलिस बंदोबस्तात नाशिकसाठी एक बस धावल्याने आता प्रवाशी वर्गाला एसटी सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करावे यासाठी एसटी कामगारांनी गेल्या ५४ दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. राज्य शासनाने अनेक वेळा कामगार संघटनांशी चर्चा करूनही संपाची ही कोंडी खाजगी वाहतूक व्यावसायिकांकडून जनसामान्यांची लूट होत आहे. दरम्यान गुरुवारी मालेगाव आगारातील एक वाहक व एक चालक असे दोन कर्मचारी काम गावर हजर झाल्याने गेले ५४ दिवस थांबलेली एसटीची चाके पुन्हा गतिमान झाली आहेत .प्रवासी वर्गाला सुटलेली नसल्याने सर्व सामान्य सुरू प्रवाशी अडचणीत आले आहेत. आगारातून नाशिक साठी ही बस फेरी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात स्थानिक पोलिसाच्या बंदोबस्तात ही बस नाशिककडे रवाना करण्यात आली. यावेळी आगार व्यवस्थापक किरण धनवटे, पोलीस निरीक्षक देवरे विभागीय वाहतूक निरिक्षक वृषाली भोसले अर्जुन तलवारे आदी उपस्थित होते. आणखी कर्मचारी कामावर रुजू झाल्यास आणखी काही मार्गावर बस सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल असा आशावाद आगार व्यवस्थापक धनवटे यांनी व्यक्त केला.