पालिमय महाराष्ट्र जाणीव जागृती मेळावा मालेगाव येथे संपन्न
मालेगांव :(दि. १५ डिसेंबर २०२१) :- मालेगाव येथील गायत्री भवन येथे पालिमय महाराष्ट्र जाणीव जागृती मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात भ.बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.सोनोने सर (लातूर) यांनी पाली भाषा विषयी समर्पक माहिती दिली, पाली भाषा शिकणे का गरजेचे आहे आणि पाली भाषेद्वारे आपण आपले भविष्य कसे घडवू शकतो पालि भाषा शिकून कशी बोलायची, व्यवहारात पालि भाषेचे पुनरुज्जीवन, लाखो-करोडो रु. फेलोशिप कशी घ्यायची, MPSC, UPSC द्वारे IAS, IPS, तहसिलदार इ. च्या नोकऱ्या कशा संपादित करायच्या, आपले करियर कसे घडवायचे याबाबत मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले. डॉ.सोनोने सर यांचा परिचय प्रा.थोरात सरांनी करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.संजीव वाघ सर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात पालिभाषा द्वारे आपले सर्वांगीण विकास साधता येऊ शकतो, मेळाव्यात सहभागी मार्गदर्शक म्हणून मा. बाळासाहेब थोरात, मा. संतोष जाधव, मा. वैशालि सोनोने, मा. वसुंधरा भगत. मा. मंगल मोरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्ममित्र हंसराज भालेराव यांनी केले.
या कार्यक्रमास राहुल शिंदे, दीपक निरभवणे, नीरज सिंह, दिलीप पाथरे, प्रा. डॉ.राज त्रिभुवन, सुनील पवार,शुभम थोरात, विनोद त्रिभूवन, सिद्धार्थ पवार, अमोल जगताप सर अॅड.मुकेश त्रिभुवन, नंदू डावरे, किरण राजवंशी,निनाद म्हसदे, प्रदीप खरे, आकाश सुरवाडे, मोहन राजवंशी, अक्षय जगताप, आणि राजेंद्र ढिवरे, विकास निकम आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सम्यक संकल्प परिवार व मानव उद्धार फाउंडेशन यांनी संयुक्त पणे केले होते.लवकरच याबाबतीत पुढील नियोजन करण्यात येईल असे आयोजकांकडून सांगण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित तेली व आभार अविनाश आहिरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथेने करण्यात आली.