मच्छीमार बांधवांची मालेगाव ते मुंबई राजभवनापर्यंत पायी दिंडी निघणार

मच्छीमार बांधवांची मालेगाव ते मुंबई राजभवनापर्यंत पायी दिंडी निघणार...... 


वैभव सोनवणे /मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी

चंदनपुरी (दि.१६ डिसें २०२१) : चंदनपुरी मालेगाव ते राजभवन मुंबई अशी मच्छीमार बांधवांची पायी दिंडी निघणार आहे. दिंडी थेट राज्यपाल मोहदय यांच्या राजभवना पर्यंत पायी निघनार असे शेखर पगार यांनी सांगितले. चंदनपुरी येथे खंडेराव महाराज  दर्शन घेऊन  शांततेच्या मार्गाने  थेट राज्यपाल मोहदय यांच्या राजभवना  पर्यंत निघनार आहे. प्रशासनाला काेणताही त्रास होणार नाही ही काळजी घेतली जाणार तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळून सदर दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मालेगाव तालुक्यातील मच्छीमार बांधवांच्या न्याय व हक्कासाठी अनेक दिवसांपासून लढा देणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते शेखर दादा पगार यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमार बांधवांच्या समवेत उद्या मालेगाव ते मुंबई अशी पायी दिंडी राजभवना पर्यंत निघणार आहे. स्थानिक प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यामुळे थेट राज्यपाल यांच्याकडे न्याय मागण्यासाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. 

          सदर दिंडीला सुमारे दोन हजार मच्छीमार बांधव सहभागी होणार आहेत असे आयोजकांनी सांगितले. चंदनपुरी येथुन खंडोराव महाराजांचा आशिर्वाद घेऊन दिंडीला सुरूवात होणार आहे, आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की उद्या चंदनपुरी येथे ठिक ९ वाजता उपस्थित राहुन आपल्या मच्छीमार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते शेखर पगार , शहर अध्यक्ष  शुभम भदाणे,विकास खेडकर, योगेश गर्दे,संजय शिवदे,बाबाजी पवार,सतिष जाधव,विष्णु सोनवणे ,सोनु मोरे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने