अजंग वडेल जवळ बायपास जवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात
वैभव सोनवणे /मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी
मालेगांव : (दि. १५ डिसेंबर २०२१) :-मालेगाव-नामपुर रस्त्यावरील अजंग वडेल जवळ बायपास जवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. दुचाकी क्रमांक एमएच 41 ई 5873, एम एच 18 ए डी 8304 या दुचाकींचा समोरासमोर धडक झाल्यामुळे आज सायंकाळी 5/6 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला त्यामध्ये दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. असून स्थानिक नागरिकांनी अपघात झाल्यानंतर ताबडतोब मदत करत रुग्णवाहिकेला पाचारण करून ताबडतोब जखमींना रुग्णालयात हलविले समोरासमोर झालेल्या या अपघातामुळे दोघा दुचाकींची ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमींची ओळख अजून पटली नाही. सदर या दोन्ही जखमी व्यक्तीना अंजग गावचे सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार यांनी रुग्णवाहिका बाेलवुन प्रयास हाॅस्पिटल नेले असे त्यांनी सांगितले.