कॉलेज स्टॉपलगत असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात न आल्यास अभावितर्फ आंदोलनचा इशारा
वैभव सोनवणे /मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी
मालेगाव (दि. १३ डिसें ) :- कॅम्प रोडवरील काॅलेज थांब्रयाजवळ स्त्यावर असेलेल्या खड्ड्यांमुळे तसेच बंद पथदीपांमुळे अपघातांच्या घटना सातत्याने वाढत आहे. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीचा टेम्पाने धडक दिल्याने मृत्यु झाला. या खड्यांची दुरुस्ती येत्या दोन दिवसांत न झाल्यास तीव्र आंदोनल छेडण्याचा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फ देण्यात आला आहे. रस्ते दुरुस्तीसाठी अभाविपचा आंदोलन इशारा अपघात घडण्याचे प्रकार कॉलेज रोडवरील कॉलेज स्टॉपवर सातत्याने घडत आहेत. काही दिवसांपूर्वी टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीवरील विद्यार्थिनी गंभीररित्या जखमी झाल्याने जागीच ठार होण्याची घटना घडली आहे. खड्यांमुळेच हे अपघात घडत असल्याने त्यांची दुरुस्ती व्हावी. या सदंर्भात अभावितर्फ सातत्याने निवेदने व आंदोलने केली गेली. मात्र मनपातर्फे या आंदोलनांची दखल न घेण्यात आल्यानेच एका विद्यार्थीनीस आपले प्राण गमवावे लागले आहे. येत्या दोन दिवसात कॉलेज स्टॉपलगत असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात न आल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. मनपा सहाय्यक आयुक्त अनिल पारखे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अभाविप पदाधिकाऱ्यांतर्फे निवेदन देण्यात येवून कॉलेज स्टॉप परिसरातील रस्त्यांवरील खड्यांमुळे तसेच बंद पथदीपांमुळे होत असलेल्या अपघातांच्या घटनांकडे लक्ष वेधण्यात आले. या भागात महाविद्यालये तसेच विद्यालय व खासगी शिकवणींचे कलासेस सुरु असल्याने विद्यार्थ्यांची सदैव वर्दळ असते. कॅम्प रोडवर २४ तास वाहतूक सुरु असते. खड्डे चुकविण्याच्या नादात यावेळी शहराध्यक्ष प्रवीण पाटील, शहर मंत्री गणेश हिरे, शहर सहमंत्री प्रशांत बच्छाव, अश्विनी माळी, शुभम खैरनार, कनक सुर्यवंशी, विलास देवरे, सौरभ येवले, तुषार महाले, महेश वेताळ, तुषार जाधव, कार्तिक पवार, कृष्णा सातपुते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.