चांदवड येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वृक्षारोपण करुन साजरा
वैभव सोनवणे /मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी
चांदवड: (दि. १३ डिसें) :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पार्श्वभूमीवर क्रिडा व युवक सेवा संचलनालय जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय आणि मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था झाडी व शिवशक्ती सेवाभावी बहुउद्देशीय संस्था चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने माझे संकुल माझे झाड या मोहिमेअंतर्गत चांदवड तालुका क्रीडा संकुल येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वड, पिंपळ आदी वृक्ष रोपट्यांची लागवड करण्यात आली यावेळी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयामार्फत चांदवड तालुका क्रीडा अधिकारी माननीय पी.एम. पवार सर यांनी माझे संकुल माझे झाड ही संकल्पना सांगितली व अमृत महोत्सवानिमित्त आपण सर्वांनी क्रीडा संकुलामध्ये देशी झाडांची लागवड करून जतन करावे असे आवाहन केले. तसेच मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतिष साळुंके यांनी माझे संकुल माझे झाड या अंतर्गत परिसरामध्ये 75 वा स्वातंत्र्याचा वाढदिवस म्हणून 75 देशी झाडे लावण्याचा संकल्प केला या ठिकाणी चांदवड तालुका क्रीडा शिक्षक समिती अध्यक्ष मा. निंबाळकर सर तसेच नेमिनाथ जैन चे क्रीडाशिक्षक ठाकरे सर गोरक्षनाथ प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक मा. प्रशांत परदेशी सर, हेमंत सोनवणे सर, अमोल बच्छाव सर, विद्या अहिरे मॅडम, कविता उशीर, चैताली उशीर, मनीषा उशीर, अश्विनी पाटील, मंदाकिनी उशीर, कृष्णा मोरे हे उपस्थित होते.