पाताळेश्र्वर माध्यमिक विद्यालयात गणितोत्सव निमित्त भरला बाल गणिततज्ञांचा मेळावा
सिन्नर दि.२३ डिसें) :- पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात निपुण भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितोत्सवाचे आयोजन दि. २० डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले. भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो या निमित्ताने, गणित परिपाठ, गणितीय रांगोळी, चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा, गणित जत्रा, गणितीय शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी व गणित शिक्षकांनी आपल्या गणितीय प्रतिकृती मांडल्या.
याप्रसंगी स्पर्श हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर योगेश आव्हाड, डॉ. सौ मनीषा आव्हाड, डॉ. अंकुश आव्हाड, डॉ. सौ. रोहिणी आव्हाड यांनी गणित दिनाचे महत्व विषद केले. डॉक्टर योगेश आव्हाड यांनी मुलांनो गणिताची भीती बाळगू नका गणिताला सोपे करा गणिताच्या जवळ जा परंतु गणिताचे आयुष्यात उपयोजन शिका. खेळ खेळा, व्यायाम कसरतीतून आरोग्य सांभाळा व जीवनाचे ध्येय गाठा असा मौलिक संदेश दिला . आधुनिक शिक्षणाचा आपल्या जीवनात उपयोग व्हावा म्हणून आम्ही स्पर्श (आव्हाड ) कुटुंब विद्यालयास एल.सी.डी. प्रोजेक्टर भेट देत आहोत.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस.बी. देशमुख यांनी आव्हाड कुटुंबांनी घेतलेल्या वैद्यकीय सेवेचा वसा हा खरोखर समाजाभिमुख असून आपल्या मातापित्यांच्या कर्तृत्वास दाद देणाराच आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन उच्च वैद्यकीय पदवी धारण करणे म्हणजे आकाशास गवसणी घालने.
विद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणित प्रतिकृती व गणित शिक्षक श्री. रेवगडे टी.के यांनी हसत खेळत गणित व गणिताची उपयोगिता या गणित साहित्याचे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व प्रमुख अतिथी यांनी प्रत्यक्ष कृतीतून साहित्य हाताळून आनंद घेतला. गणित शिक्षक श्री. गिरी आर.टी, चव्हाण बी .आर, श्रीमती. शिंदे सी .बी, सौ. सविता देशमुख यांनी विद्यार्थ्यांना गणिताच्या गमती - जमती व गणित क्लुप्त्या सांगितल्या. तसेच शालेय समिती सदस्य, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. चंद्रभान रेवगडे, प्रथम नागरिक प्रभारी सरपंच श्रीमती सुरेखा संजय बोगीर व विद्यालयातील शिक्षक श्री. निकम आर .व्ही, श्री. कोटकर एस. एम, श्री. शिंगोटे एम .सी, श्रीमती शेख एम .एम, गांगुर्डे के. डी, श्री. पाटोळे एस. डी, श्री ढोली आर . एस, थोरे, ए.बी उपस्थित होते.