हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे भव्यदिव्य बक्षीस वितरण व आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा थाटात संपन्न!
मान्यवरांच्या शुभहस्ते राज्यातील व जिल्ह्यातील 21 शिक्षकांना पुरस्कार प्रदान...
औरंगाबाद- सालाबाद प्रमाणे या 8 व्या वर्षी ही हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन तर्फे शिक्षकांसाठी ईद ए मिलादुन्न नबी निमित्त राज्यस्तरीय निंबध स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धे मध्ये विजेत्यानां पारितोषिक व ट्रॉफी चे वितरण करण्यात आले व् तसेच शिक्षक - शिक्षिका मध्ये उत्कृष्ट् शिक्षण देणाऱ्यां शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले ,या कार्यक्रमा चे अध्यक्ष स्थानी मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा मार्गदर्शक मा.युनूस पटेल साहेब हे होते तसेच प्रमूख पाहुणे व मुख्य आकर्षण औरंगाबाद शहराचे लाडके खासदार मा.सय्यद इम्तियाज जलील साहेब हे दिल्लीहून आवर्जून उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून कांग्रेस प्रदेश कमिटी चे सरचिटणीस डॉ. जफर साहेब, आमचे सल्लागार तथा प्राचार्य मा.डॉ.सय्यद नईम, सिल्लोड चे माजी नगरसेवक मा.कॉ. शेख बाबू, लायन्स क्लब सिडको चे अध्यक्ष मा.श्रीनिवास दराडे, शासकीय ITI कॉलेज चे माजी प्राचार्य डॉ.शेख सलीम,परीक्षा मंडळ औरंगाबाद चे कार्यवाह मा.नवाब नक्षबंदी आदींची उपस्थिति होती. कार्यक्रमाची सुरुवात च्या कुरआन पठणानी तर कार्यक्रमाची सांगता(शेवट) राष्ट्रगीत गायन करून झाली.सर्व प्रथम सर्व प्रमुख पाहुण्यांचे हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन च्या परंपरा नुसार सर्वाना पुस्तक व शाल आणि मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आले.
प्रथम ईद मिलाद नबी निमीत्त घेण्यात आलेल्या राज्य स्तरीय निबंध स्पर्धेतील सर्व विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली, प्रथम पारितोषिक अन्सारी आसेफा बदरूदजमा भिवंडी, दूसरे पारितोषिक मेहरूनिसा बेगम औरंगाबाद, तर तीसरे पारितोषिक समीना कौसर शफीक अहेमद धुळे, यांना एक पुस्तक ,शानदार ट्राफी , सन्मान पत्र व रोख रक्कम बक्षिसे देण्यात आली तसेच येत्या साली दोन प्रोत्साहन बक्षिसे अनुक्रमने अब्दुल मुजीब अमरावती, गौसिया बेगम मोहंमद बिन अहेमद साहब औरंगाबाद यांना देण्यात आले.तर प्रमाणपत्रे अनुक्रमे शेख अलीमुनिसा बेगम औरंगाबाद, फरीसा जबीन, औरंगाबाद. नंतर आदर्श शिक्षक-शिक्षका पुरुस्कार 2021 मनपा उर्दू शाळेतून फरजाना अब्दुल करीम, मनपा मराठी शाळेतून प्रतिभा टेमकर, खाजगी उर्दू शाळेतून फरजाना बेगम अब्दुल्लाह, खाजगी मराठी शाळेतुन उमेश डावखार अणि जि.प उर्दू शाळेतून ऊजमा बेगम अब्दुल्लाह मसूद, मराठी जि. प शाळेतून अनिल संपत पोघे तर आदर्श कला शिक्षक पुरस्कार उर्दू माध्यमातून जकी उर रहमान यांना तर मराठी माध्यमातून उदय भोईर यांना देण्यात आले तसेच आदर्श क्रिडा शिक्षक उर्दू माध्यमातून समीर शफीक शेख तर मराठी माध्यमातून रामकीसन गायकवाड याना प्रदान करण्यात आले या वर्षी 3 पुरस्कार राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून गौरविण्यात आले उर्दू जिल्हा परिषद माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील शाहीन सुलताना यांना तर मराठी जिल्हा परिषद माध्यमातून सातारा जिल्ह्यातुन प्रदीप महादेव कुंभार यांना देण्यात आले तसेच मराठी माध्यमातून जळगाव जिल्ह्यातून वर्षा साहेब अहिरराव सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक-शिक्षिकांना मान्यवराच्या हस्ते ट्राफी, सन्मान पत्र एक पुस्तक आणि शाल देण्यात आले. कार्यक्रम मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे हा सोहळा थाटात उत्साहात पार पडला, कार्यक्रमाच्या सुरेख सूत्र संचालन गुलनार तहसीलदार यांनी केले तर प्रस्ताविक संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर तर मार्गदर्शन भाषणात खासदार इम्तियाज जलील, डॉ. जफर साहेब, प्राचार्य डॉ. सय्यद नईम आदींचे मार्गदर्शन भाषण केले. अध्यक्षणीय भाषन प्राचार्य युनूस पटेल साहेब यांनी मार्गदर्शन केले. फॉउंडेशन प्रत्येक कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे तसेच शिक्षकांनीं आपली जबाबदारी खंबीर पणे पाळावी तसेच हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन च्या सर्व टीम खासकर रहीम सरांना बधाई देतो की त्यांनी इतके चांगले आतापर्यंत उपक्रम यशस्वीपणे राबविले आहे हा शिक्षकांना प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहे असे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील साहेब म्हणाले, डॉ. जफर साहेब शिक्षकांची जबाबदारी वाढली आहे कारण आता पुरस्कार मिळाले आहे.अध्यक्षणी भाषणात प्राचार्य युनूस पटेल साहेबांनी शिक्षकांचे समस्या आणि या वर निराकरण केले आभार प्रदर्शन शफिक पठाण सर यांनी केले. या कार्यक्रमा मध्ये शिक्षक -शिक्षिका, मित्र परिवार तसेच शैक्षणिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या नंतर सर्व शिक्षक-शिक्षिकांनी रिफ्रेशमेन्ट आणि चहा चा आस्वाद घेतला. या भव्य दिव्य कार्यक्रमा च्या यशस्विते साठी हॅप्पी टू हेल्प फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम, शेख शब्बीर, शफीक पठाण, सय्यद ताजीमोद्दीन, डॉ. सोहेल नवाब, शेख जफर, ऍड.इरफान खान, शेख साबीर, शेख शकुर,शेख यासेर, शेख रहीम, शेख वसीम, फरमान खान, शेख अलीम, अजीम अहेमद खान, सय्यद शारीक, महिला राज्य उपाध्यक्षा गुलनार तहसीलदार, महिला राज्य सरचिटणीस शाहीन नाज, सबा खान, आदिनी प्रयत्न केले.