रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप. बँकेचा ११ वा वर्धापनदिन संपन्न व नवीन जागेत स्थलांतर

रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप. बँकेचा ११ वा वर्धापनदिन संपन्न व नवीन जागेत स्थलांतर



मालेगांव- रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप. बँक मालेगांव या शाखेचा ११वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला. तसेच शाखेचे जुनी सांगली बँक समोर, आझाद चौक, मालेगांव या नवीन जागेत स्थलांतर झाले. वर्धापनदिन प्रसंगी बँकेचे संस्थापक चेअरमन श्री.प्रशांतजी भालेराव,व्हाईस चेअरमन श्री.नितीनजी भालेराव, मुख्य सी.ई.ओ. हरिश्चंद्रजी मोरे, जनरल मॅनेजर श्री. गणेशजी गाढे, शाखाधिकारी श्री. लक्ष्मणजी खरात, कॅशिअर श्री. प्रशांत बच्छाव, लिपिक श्री. भूषण गिते व बचत प्रतिनिधी श्री. विशाल बोरसे सर उपस्थित होते. वर्धापनदिन प्रसंगी मालेगांव शहारातील प्रशासकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शाखेला भेट दिली व शुभेच्छा दिल्या. सलग ११ वर्षांपासून शाखेतर्फे ग्राहकांना अनेक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पुढेही असाच विश्वास ग्राहकांनी शाखेवर ठेवावा असे आवाहन संचालकांकडून करण्यात आले आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने