सैन्यभरती साठी पात्रता,विव्दत्ता, निर्णय क्षमतेची आवश्यकता- माजी विंग कमांडर महेशजी खैरनार - GRP NEWS महाराष्ट्र

 सैन्यभरती साठी पात्रता,विव्दत्ता, निर्णय क्षमतेची आवश्यकता- माजी विंग कमांडर महेशजी खैरनार


मालेगाव- (दि. १२ डिसें) : मा.ए.सोसायटी संचलित झुं.प.काकाणी विद्यालय व कै श्री. रा. क.काकाणी कनिष्ठ महाविद्यालया मार्फत सीडीएस प्रमुख जनरल बिपिन रावत व त्यांच्या सहकाऱ्यांना आगळ्यावेगळ्या रीतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आज दिनांक 11 /12/ 21 वार शनिवार रोजी झालेल्या या भावपूर्ण श्रद्धांजली पर कार्यक्रमास माजी विंग कमांडर व मालेगावचे भूमिपुत्र श्री महेशजी प्रदीप खैरनार ऑनलाइन च्या माध्यमातून उपस्थित होते. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीने तीनही शाखेच्या विद्यार्थ्यांना मिल्ट्रीच्या तीनही शाखे संदर्भात माहिती दिली. आणि महाराष्ट्रातील मुलांनी सैन्यात येण्याचे आवाहन केले . पात्रता, विद्वत्ता, निर्णय क्षमता, ह्याच गोष्टी सैन्यात येण्यासाठी महत्त्वाचे असतात.आणि त्यांनी त्या गोष्टी विद्यार्थ्यांना सकारात्मक रित्या पटवून दिल्या. व सर्वांनाच मातृभूमीच्या सेवेसाठी स्फूरण दिले.याप्रसंगी कॉलेजच्या प्राचार्या अस्मर मॅडम सौ. अस्मर मॅडम व सहकारी शिक्षक उपस्थित होते .कार्यक्रमाचे नियोजन श्री नरेश शेलार, श्री हर्षद देवरे, श्री हेमंत चंद्रात्रे,यांनी केले. आणि शेवटी श्री खैरनार साहेबांचे आभार श्रीयुत कापडणीस सरांनी व प्राचार्य अस्मर मॅडम यांनी व्यक्त केले .जनरल बिपिन रावतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने