गरबड गावातील लोकांना जमातीचे दाखले मिळाले नाहीतर सदर कार्यालयावर मोर्चा व ठिय्या आंदोलन - GRP NEWS महाराष्ट्र

गरबड गावातील लोकांना जमातीचे दाखले मिळाले नाहीतर सदर कार्यालयावर मोर्चा व ठिय्या आंदोलन 


वैभव सोनवणे /मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी

मालेगाव (दि.११ डिसे) : आदिवासी विचार मंच शाखा गरबड यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जमातीचे दाखले मिळाले नाही म्हणून प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांना निवेदन देण्यात आले. मालेगाव तालुक्यातील गरबड या शंभर टक्के आदिवासी लोकवस्तीच्या गावात महादेव कोळी व भिल जमातीचे लोक राहतात. गेल्या सप्टेंबर महिन्यात गरबड गावातून जमातीचे दाखले मिळावे यासाठी अनेक अर्ज दाखल करण्यात आले होते. आजपर्यंत यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. जमातीचे दाखले न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश, आदिवासी वसतिगृह प्रवेश, शिष्यवृत्ती योजना, प्रशिक्षण योजना यापासून वंचित राहावे लागत आहे. कळवण प्रकल्पाच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या नागरिकांना मोफत प्रमाणपत्र मिळणार असे सुचित केले असतांनाही सदर कार्यालयात फी वसूल करून लूट करण्यात येत आहे. या निवेनाद्वारे इशारा देण्यात येतो की , दि . २२ / १२ / २०२१ पर्यंत गरबड गावातील लोकांना जमातीचे दाखले मिळाले नाहीतर सदर कार्यालयावर मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात येईल. पुढे येणाऱ्या निवडणुकांवर गरबड गावाच्या वतीने संपूर्ण बहिष्कार टाकला जाईल . निवेदनावर गरबड ग्रामस्थांच्या सह्या असून समाधान गुमाडे, अक्षय सारूक्त, सुनिल सबगर, सोमनाथ भांगरे, काकाजी भांगरे व रमेश गुमाडे यांनी निवेदन दिले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने