झुं.प.काकाणी विद्यालयात जनरल बिपिन रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मालेगाव (दि.10 डिसें):-मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित झुं. प. काकाणी व कै. रा. क. काकाणी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून भारताचे संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 जणांना आपले प्राण गमवावे लागले.या दुर्दैवी दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असून देशाची खूप मोठी हानी झालेली आहे. ते भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) होते. तसेच भारतीय लष्कराचे २६ वे लष्करप्रमुख देखील होते.
विद्यालयातील शिक्षक श्री हेमंत चंद्रात्रे, श्री नरेश शेलार यांनी जनरल बिपिन रावत यांच्या कार्याविषयी माहिती दिली. यावेळी विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. शुभांगी अस्मर, पर्यवेक्षक श्री अनिल गोविंद, श्री किशोर गोसावी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.