चंदनपुरी येथे मचछिमारांचे भीक मांगो आंदोलन
वैभव सोनवणे /मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी
चंदनपुरी (दि.08 डिसें) : गिरणा धरणावरील ठेकेदार स्थानिक मच्छीमारांना विरोध करत असल्याने आज स्थानिक मच्छीमारांनवर उपासमारीची वेळ आली असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चंदनपुरी येथे मचछिमारांचे भीक मांगो आंदोलन करून स्थानिक मच्छिमार राज्यपालांच्या कार्यालयापर्यंत पदयात्रा काढणार असून प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करणार असल्याचे सांगितले आहे. गिरणा धरणावरील ठेकेदार हा स्थानिक मच्छीमारांना खोट्या केसेस दाखल करण्याच्या धमक्या देत असल्याने स्थानिक मच्छीमार हा मानसिक तणावाखाली आला असल्याने आज स्थानिक मच्छीमार बेरोजगार झाला असल्याने आज मुला बाळांचे शिक्षण कसे करावे, परीवार कसा चालवावा या विवंचनेत आहे. या कारणांमुळे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चंदनपुरी येथे मच्छिमारांनी गावात फेरी मारुन भिक मांगो आंदोलन केले. यावेळी शेखर पगार, संजय शिवदे, उमेश पाटील, मोहन जावरे, व महिलांचाही मोठा समावेश होता.