नगरसेवक संजयजी काळे ह्यांच्या 50 लाखाच्या विकासकामांच्या शुभारंभ
वैभव सोनवणे मालेगाव तालुका ग्रामीण प्रतिनिधी:
मालेगाव दि ५ डिसेंबर: मालेगाव येथे काल केंद्रीय माजी संरक्षण राज्यमंत्री व विद्यमान खासदार आदरणीय डॉ.सुभाषजी भामरे ह्यांच्या शुभहस्ते संपन्न झालेल्या नगरसेवक संजयजी काळे ह्यांच्या 50 लाखाच्या विकासकामांच्या "शुभारंभ प्रसंगी" मालेगाव भाजपा जिल्ह्याचे सर्व "प्रथम फळी" चे दिग्गज मान्यवर "व्यासपीठावर" आवर्जून उपस्थित होते.
भाजपा च्या माध्यमातून प्रभाग 9 मधून, निस्पृह, कर्तव्यदक्ष नगरसेवक संजय जी काळे विकास कामे करीत असल्याने आदरणीय खासदार डॉ. बाबा स्वतः जातीने उपस्थित होते. मालेगाव तालुक्यातीलच नव्हे पंचक्रोशीतील युवानेते, प्रसंगी आक्रमक भूमिका घेणारी "बुलंद तोफ" अशी ख्याती असलेले माननीय अद्वयजी आबा हिरे ह्यांची प्रत्यक्ष उपस्थिती कार्यक्रमाच्या भव्यतेत भर घालणारी ठरली. कापडणीव्या सपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश नाना निकम जी, नाशिक जिल्हा ग्रामिण चे माजी जिल्हाध्यक्ष व विद्यमान प्रदेश कार्यकारीणी पदाधिकारी दादासाहेब जाधव, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष स्वप्निल भदाणे नाशिक जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान प्रदेश पदाधिकारी लकी आबा गिल, जिल्हा उपाध्यक्ष हरिप्रसादजी गुप्ता, जिल्हा पदाधिकारी भरत भाऊ पोफळे, मालेगाव ग्रामीण चे तालुकाध्यक्ष निलेश जी कचवे, जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस देवा पाटील, कोषाध्यक्ष सुधीर जी जाधव, मालेगाव शहरातील युवा नेतृत्व दिपकजी गायकवाड, नगरसेवक राजेंद्र जी शेलार, विजयजी (गजू अण्णा) देवरे, माजी नगरसेवक व कॅम्प भागातील धडाडीचे युवा नेतृत्व जगदीश जी गोर्हे, गवळीवाडा येथील हनुमान व्यायामशाळेचे अध्यक्ष सोमन्ना गवळी, तसेच करंजगव्हाण/माळमाथ्याचे धडाकेबाज नेतृत्व संभा काका कापडणीस असे जेष्ठ, श्रेष्ठ भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.