पुन्हा विजा कडकणार डिसेंबर मध्ये पुन्हा पाऊस बरसणार

 पुन्हा विजा कडकणार डिसेंबर मध्ये पुन्हा पाऊस बरसणार 

सध्या महाराष्ट्रतील काही शहरांमध्ये कड्याक्याची थंडी पडली आहे . अशातच आता हवामान खात्याने महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो . असा अंदाज वर्तवला आहे . 28 डिसेंबर रोजी औरंगाबाद , जालना , जळगाव , गोंधीया , भंडारा , वर्धा , नागपूर , अमरावती , अकोला जिल्ह्यांत या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो , तर 27 डिसेंबर रोजी विदर्भाच तुरळक प्रमाणात पाऊस पडेल , असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता . मात्र याबाबत IMD कडून हवामानाचे ताजे अपडेट जाहीर करण्यात आले आहेत .

देशभरात हुडहुडी , थंडीचा कडाका वाढला हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार , उत्तरेकडील भागांत बर्फवृष्टीमुळे लेह - लडाख यांसारख्या जागांवर पारा उणे अंशांवर पोहोचला आहे . त्यासोबतच दिल्ली , राजस्थान , पंजाब , ओदिशा या राज्यांतही थंडी वाढल्याचं पाहायला मिळत आहे . दरम्यान , हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार , दिल्लीमध्ये येत्या काही दिवसांत वाढत्या थंडीपासून दिलासा मिळू शकतो . IMD ने म्हटलंय की , 5 जानेवारी 2022 पर्यंत भारतातील बहुतांश भागात थंडीची लाट राहणार नाही . पण आज म्हणजेच , 2७ नोव्हेंबर रोजी देशाच्या विविध भागात थंडीची लाट येऊ शकते . IMD ने आपल्या एका अंदाजात म्हटले आहे की , 27 ते 30 डिसेंबर दरम्यान , सक्रिय पश्चिमी विक्षोभामुळे बिहारच्या अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने