नामपूर महाविद्यालयात स्वर्गीय रेणुका आजी हिरे यांना ११४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

नामपूर महाविद्यालयात स्वर्गीय रेणुका आजी हिरे यांना ११४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

नामपूर (दि. ३० डिसेंबर २०२१) : समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामपूर येथे प्राचार्य डॉ आर पी भामरे यांच्या मार्गदर्शनाने व उपप्राचार्य डॉ यू बी कदम यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय मातृतुल्य रेणुका आजी हिरे यांना ११४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रथमता मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय रेणुका आजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

        या कार्यक्रमास इतिहास विभागातील प्रा जयराम माळी हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले. त्यांनी भाऊसाहेब हिरे यांच्या बद्दल प्रथमता माहिती सांगून प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्रीचा हात असतो जसा की बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे रमाबाई, ज्योतिबा फुले यांच्या मागे सावित्रीबाई तसेच भाऊसाहेब हिरे यांच्या यशामागे रेणुका आजींचा हात होता असे नमूद केले. 

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा एम आर क्षीरसागर तर आभार प्रदर्शन शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा डॉ एम डी अहिरे यांनी केले. 

       कार्यक्रमास महाविद्यालयाचे वरिष्ठ विभागाचे शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा डॉ एम डी अहिरे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा संदीप निकम, शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा ए डी पाटील, कार्यालयीन अधिक्षक श्री डी एम पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा डॉ एस जी वाघ व प्रा. एम आर क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने